शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरी : थरारक पाठलाग करून आरोपीस पकडले  - गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:02 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी मध्यरात्री तब्बल १८ कि.मी थरारक पाठलाग करून गोवा बनावटीची चोरटी वाहतूक करणाºया वेंगुर्ला-गवळवाडा येथील सिताराम देवजी साठे (३७) या संशयित आरोपीला १० लाख ४२ हजार

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई

सिंधुदुर्गनगरी :  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी मध्यरात्री तब्बल १८ कि.मी थरारक पाठलाग करून गोवा बनावटीची चोरटी वाहतूक करणाºया वेंगुर्ला-गवळवाडा येथील सिताराम देवजी साठे (३७) या संशयित आरोपीला १० लाख ४२ हजार ८०० रुपये मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कारमध्ये विविध ब्रॅन्डचे दारूचे ४७ बॉक्स होते. ही कारवाई रात्री २ वाजता आंबोली चेकपोस्ट येथे करण्यात आली.

गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती खब-यांकडून मिळाली होती. त्या आधारे मंगळवारी रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक आंबोली बेळगाव रस्त्यावर दाणोली तिठा येथे जावून थांबले होते. काही मिनिटाच्या फरकाने बांदा दाणोली तिढा येथून एक कार वेगात जात असल्याचे निदर्शनास आले. 

या कारला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र भरारी पथकाच्या या इशा-याकडे कार चालकाने दुर्लक्ष करत आपल्या ताब्यातील वाहन सुसाट वेगाने पुढे नेले. त्यामुळे पथकाने त्वरीत खासगी वाहनाने कारचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. पळून जाणारा सुसाट वेगाने  वाहन चालवत होता. अखेर १८ कि.मी. अंतर पाठलाग करत  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पळून जाणाºया वाहनाच्या आडवे आपले वाहन घालून गाडी तपासणीसाठी थांबविली. 

दहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात

त्यात गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ४७ बॉक्स आढळून आले. या सर्व दारूची किंमत २ लाख ८२ हजार ८00 रुपये एवढी होते. तर कारची किंमत ७ लाख ५0 हजार असा एकूण १0 लाख ४२ हजार ८00 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयीत आरोपी सिताराम साठे याला ताब्यात घेण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री दोन वाजता घडली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक यु. एस. थोरात, डी. एम. वायदंडे, जवान आर. डी. ठाकूर, एस. एस. पवार, एस. जी. मुपडे, एच.आर.वस्त यांनी केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाºयास अटक करत मुद्देमाल ताब्यात घेतला. छायाचित्रात संशयित आरोपीसह पथकातील अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत. (छाया :  गिरीश परब)

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग